डिजिटल शाळा
जिल्हा परिषद डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा दिनांक ०३/ १० / २०१५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या उद्घाटन समारंभासाठी मा.ताईसो सुनंदा पाटील सभापती प.स.शिंदखेडा ,.मा.दरबारसिंग गिरासे ,उपसभापती पं.स.शिंदखेडा मा.जी.के.अहिरराव अध्यक्ष ए अंड जी फौंडेशन नासिक , मा.ताई सो. मीनाताई विजय टाटीया सरपंच खलाणे व सन्मा.सर्व ग्रामपंचायत सदस्य ,मा.डी.पी.बुवा सो .शि.वि.अ.चिरण बीट,मा.नानासाहेब बोरसे सो केंद्र प्रमुख कलमाडी मा.सर्व तालुक्यातील विस्तार अधिकारी ,सर्व सन्मानिय केंद्रप्रमुख,सर्व सन्मानीय मुख्याध्यापक या सोहळ्यास उपस्थित होते.डिजिटल शाळेच्या प्रोजेक्टर व इतर सर्व खर्चासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १,००,००० /-- लोकवर्गणी जमा करून खलाणे शाळा डिजिटल केली.ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेत डिजिटल लर्निग सुरु झाले आहे.
डिजिटल क्लासरूम
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात शासन स्तरावरून डिजिटल क्लासरूम साठी तीन LED TV व तीन TAB शाळेला देण्यात आले.या LED व TAB मुळे सध्या तीन वर्ग डिजिटल क्लास रूम सुरु झालेले आहेत.या सुविधेमुळे मुलांना TAB च्या साह्याने ONLINE घटक अध्यापन करता येतो.समजायला अवघड घटक अधिक परिणामकारक विद्यार्थ्यांना समजायला मदत होते.या डिजिटल क्लासचे उद्घाटन श्री.कमलेश दादा अहिरराव ग्रा.प.सदस्य ,माजी मुख्याध्यापिका सौ.पुष्पलता अशोक दुसिंग ,व सर्व शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment