शाळेचा पूर्व इतिहास

                    तापी नदीच्या खोऱ्यात बुराई नदीच्या शेजारी सूर नदीच्या काठावर समुद्र सपाटीपासून खोलगट भाग असल्यामुळे गावाचे नाव खलाणे देण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळा खलाणे शाळेचा जन्म १५ ऑगस्ट १९०६ रोजी झाला .सुरुवातीला हि शाळा गावाच्या समाज मंदिरात भरत होती.कालांतराने स्कूल बोर्ड निर्माण झाल्यानंतर जि.प.मालकीच्या गावाच्या नैऋत्य दिशेला सहा वर्ग खोल्यांचे बांधकाम सन १९५२ साली झाले.सुरुवातीला कौलारू इमारत होती.नंतर १९६३ साली चार वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले.त्याचप्रमाणे डी.पी.ई.पी.अंतर्गत सन २००० मध्ये दोन वर्ग खोल्याचे बांधकाम झाले.गावालगत महादेवाचे मंदिर आहे.ते मंदिर गुपित महादेव या नावाने परिचित असून जागृत देवस्थान म्हणून गावातील भाविक श्रद्धेने महादेवाची यात्रा भरवतात.गावाला शिंदखेडा ते धुळे जाणारा मध्यमार्ग आहे.गावाच्या दक्षिणेला डोंगर रांगा आहेत.गावाच्या मुख्य व्यवसाय हा शेती असून गावात छोटेमोठे लघुउद्धोग चालतात. देशाला शिक्षक,अभियंते,डॉक्टर ,वकील ,ग्रामसेवक,तलाठी,सैनिक ,समाजसेवक,देशभक्त असे नामवंत विद्यार्थी शाळेने घडवलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिक्षक माहिती