जिल्हा परिषद डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा दिनांक ०३/ १० / २०१५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या उद्घाटन समारंभासाठी मा.ताईसो सुनंदा पाटील सभापती प.स.शिंदखेडा ,.मा.दरबारसिंग गिरासे ,उपसभापती पं.स.शिंदखेडा मा.जी.के.अहिरराव अध्यक्ष ए अंड जी फौंडेशन नासिक , मा.ताई सो. मीनाताई विजय टाटीया सरपंच खलाणे व सन्मा.सर्व ग्रामपंचायत सदस्य ,मा.डी.पी.बुवा सो .शि.वि.अ.चिरण बीट,मा.नानासाहेब बोरसे सो केंद्र प्रमुख कलमाडी मा.सर्व तालुक्यातील विस्तार अधिकारी ,सर्व सन्मानिय केंद्रप्रमुख,सर्व सन्मानीय मुख्याध्यापक या सोहळ्यास उपस्थित होते.डिजिटल शाळेच्या प्रोजेक्टर व इतर सर्व खर्चासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १,००,००० /-- लोकवर्गणी जमा करून खलाणे शाळा डिजिटल केली.ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेत डिजिटल लर्निग सुरु झाले आहे. डिजिटल क्लासरूम सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात शासन स्तरावरून डिजिटल क्लासरूम साठी तीन LED TV व तीन TAB शाळेला देण...